BREAKING NEWS
Search

अकोला जिल्ह्यातील आलेगांव येथे चोरांचा धुमाकूळ – दीड लाख रोख व दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास

876
             पातूर जि.अकोला ( श्रीधर लाड,सा.समाजशील वृत्तसेवा) – अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगांव परिसरामध्ये गेल्या काही दिवसां पासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून आज  दि.९ गुरुवार रोजी पहाटे रात्री १-३० वाजताच्या सुमारास सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत सागर पदमने रा आलेगांव झोपडपट्टी भाग यांच्या राहत्या घराचे दार उघडून गोदरेज कपाटातील रोख १ लाख ५० हजार रुपये व सोन्याचे दागिने किंमत सुमारे ६० हजार असा एकूण दोन लाख रूपयांच्या पुढे ऐवज अज्ञात चोरट्यांनी पसार करण्याची घटना घडली.
              चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेगांव येथील सागर पदमने यांचे घर शेताला लागून असल्याने चोरांनी शेता कडून असलेल्या घराचे दार उघडून गोदरेज कपाटातील प्लॉट खरेदीसाठी आणून ठवलेले नगद रुपये दीड लाख रुपये व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने एकून दोन लाख रुपयांचा ऐवज दि.९ गुरुवार रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.सदर घटनेपूर्वी अथवा आधी माळीपुर्यातील शेताला लागून असलेल्या घरांमध्ये त्याच रात्री १-२० वाजता सुमारास दिनकर निखाडे यांच्या घराचे दार उघण्याचा चोर चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना शेजारीच असलेले दिवाकर गिर्हे यांना आढळून आल्याने त्यांनी तेवढ्याच रात्री ग्रा.पं.सद्स्य विजय बोचरे,यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला विजय बोचरे यांनी हर्षल ढोणे,सचिन बोचरे,दीपक बोचरे,दिवाकर गिर्हे, व इतर युवकांना व पोलिसाना सोबत घेऊन चोरांचा पाठलाग केला.परंतु चोरट्यांनी शेतातील अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.तदनंतर पोलीस पाटील देवनाथ धाईत, पोलीस चौकीचे जमादार इंगळे,व पोलीस कर्मचारी दादाराव आढाव आदींनी गावा बाहेर जाण्याचे रस्ते ब्लॉक करून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ञ यांची उपस्थिती
चोरीचा छडा लाण्यासाठी घटनास्थळा वर सकाळी १० वा दरम्यान ठसे तज्ञ पथकाने ठसे घेतले.तसेच श्वान पथकाने चोराच्या पायातील शेतात फसलेल्या बुटाचा स्वास श्वानाला देऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.शेतजमीन जमीन पावसामुळे ओली असल्याने श्वान पथकाला मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने चोरांचा शोध लागू शकला नाही.
घटनास्थळाला पोलीस उपवीभागिय अधिकारी डॉ रोहिणी साळुंखे यांची घटनास्थळी भेट
घटनास्थळी बाळापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन चोरट्यानी पलायन केलेल्या रस्त्याची पाहणी करून श्वान पथकाला  पाचारण करून चोरट्याचा माग करण्याचे सांगितले.या वेळी चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे,जमादार इंगळे,आढाव यांची उपस्थिती होती.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *