BREAKING NEWS
Search

अजूनही मुरबाड तालुका पावसाच्या प्रतीक्षेत ; प्रलंबीत पावसामुळे पेरणीचे काम स्थगित

213

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात 10 जून रोजी पावसाने जोरदार वादळी वाऱ्यासह आगमन केले. या वादळी वाऱ्यात मुरबाड तालुक्यातील वीज सेवा कोलमडली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत मुरबाडकर पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांची पेरणीच्या कामाला विलंब होत आहे. मुरबाड तालुक्यात दरवर्षी 20 जून पर्यंत पेरणीचे कामे पुर्ण  झालेले असतात. मात्र यावर्षी अजूनही पावसाने जोर धरला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. पावसाची वाट पाहणारे शेतकरी पेरणीसाठी बी-बियाणे घेउन सज्ज झाले आहेत. मात्र पाऊसच पडला नसल्याने शेतीचे काम पण थंडावले आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *