BREAKING NEWS
Search

माळशेज घाटातील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक उत्सुक ; गेल्या तीन वर्षांपासून पर्यटनावर बंदी

463

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : ठाणे व पुणे यांच्या मधील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील पावसाळ्यात आकर्षण ठरणारे विविधतेने नटलेला माळशेज घाट गेल्या तीन ते चार वर्षा पासून पर्यटनासाठी पावसाळ्यात बंद असल्याने यंदा माळशेज घाटातील सौंदर्य पहाण्यासाठी व धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक उत्सुक आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर दुर्घटना टाळण्यासाठी बंदी घातली जाते असे असतानाही मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात, पाडाळे धरण, गोरखगड, सिद्धगड तसेच अनेक धबधब्यावर पर्यटन बंदी घालूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यामुळें बंदी असुनही चोरून आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामूळे यंदा ही बंदी असणार का? याची चर्चा आता जोर धरू लागली असून, पावसाळी पर्यटन स्थळांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक उत्सुक असल्याचे पहायला मिळत आहे.  माळशेज घाटातील सुरेक्षेसाठी व पर्यटन स्थळांचा विकासासाठी शासन करोडो रुपये खर्च करतेय. मात्र पावसाळ्यात या पर्यटन स्थळांवर बंदी घातली जात असताना हा खर्च पाण्यात जात असल्याचे पर्यटकांकडून बोलले जात आहे. माळशेज घाट हा पावसाळ्यातील आकर्षण ठरत असताना दरवषी छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचा प्रकार घडत असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन बंदी आणते. माळशेज घाटातील दरडी कोसळण्याचा प्रकार थांबविण्यासाठी जाळी लावण्याचे काम वर्ष भर सूरू असल्याने यंदा तरी माळशेज घाट पर्यटनासाठी खुला होणार का ? असा सवाल करत घाटातील धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक उत्सुक असल्याचे पहायला मिळत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *