BREAKING NEWS
Search

अलिबाग,रायगड : अलिबाग मधील मोठ्या हाँटेल मधुन चालणा-या सेक्स रँकेटचा रायगड च्या पोलीसां कडुन पुन्हा एकदा पर्दाफाश

1509
          अलिबाग,रायगड : अलिबाग मधील मोठ्या हाँटेल मधुन चालणा-या सेक्स रँकेटचा रायगड च्या पोलीसां कडुन पुन्हा एकदा पर्दाफाश करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. या आगोदर ही अलिबाग मधील एका मोठ्या हाँटेल मधुन विदेशी महीला पुरविण्याचे आतंर राष्ट्रीय रँकेट स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने उद्वस्त केले होते व अवघ्या २ दोन महीन्यातच पुन्हा एकदा अलिबाग मधील मोठ्या हाँटेल मधून महीला पुरविण्याचा एक मोठे रँकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
          अलिबाग मधील हाँटेल विठ्ठल रुक्मीणी काँटेज, हाँटेल मीरा माधव, हाँटेल रवि किरण या ठिकाणी देह विक्री करीता महीला मागविल्या जातात याचा सुगावा लागताच पोलिसांनी सापळा रचुन  देहविक्री करीता आणलेल्या महीलां सह त्यांचे स्थानिक एजंट सहीत एकुण ७ आरोपीनां पोलीसांनी अटक केली आहे. या मध्ये   श्रीमती कल्पना केशव नेगडे वय-३८ रा. तळेगाव, श्रीमती किरण राजु साळुंखे -३८ रा. निगडी, विश्वनाथ  ज्ञानेश्वर ठाकर – २५ रा. मावळ, शिवाजी राम शिदें – ३८, रा. निगडी, सर्व रा. जिल्हा पुणे.
तसेच सोबत प्रसाद रमेश नागवेकर – ३८ रा. हाँटेल विठ्ठल रुक्मीणी, निलेश राजाराम राऊत – ४० रा. नागाव, मिथुन नित्यानदं कामत – ३२ रा.मारुती नाका, अलिबाग यांना ही एजंट गिरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आले आहे.
           या सदंर्भात अलिबाग पो स्टे मध्ये १७७/२०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन व्यापार प्रतिबधंक अधिनियम ३,४,५,६ महाराष्ट्र दारुबंदी अधि, १९४९ चे ६५ ई व भादवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपीनां १ नोव्हबंर मा. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.परंतु अवघ्या दोन महीन्यात अलिबाग मधील मोठमोठ्या हाँटेल मधुन चालणा-या सेक्स रँकेट उघडकीस आल्याची ही दुसरी मोठी घटना असुन अलिबाग मधील काँटेजस, हाँटेल्स, लाँज व्यवसाय पोलीसांच्या टार्गेटवर आहे एवढे मात्र नक्की. या मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अति पोलीस अधीक्षक सचिन गुजांळ, परी पोलीस – उप अधीक्षक श्रीमती बाविस्कर व  गुन्हे अन्वेषण चे पो नि जे एस शेख, सपोनि दिलीप सस्ते ईतर कर्मचा-यांनी या गुन्ह्याच्या तपास कामी सहभाग घेतला.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *