BREAKING NEWS
Search

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा एकता मंच संस्थेच्या मुरबाड कार्यालयाचे उद्घाटन 

390
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवलेल्या ठाणे जिल्हा एकता मंच संस्थेच्या मुरबाडमधील मुख्य कार्यालयाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते तर ठाणे जिल्हा परिवहन सदस्य तकीभाई चेऊलकर व कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे नगरसेवक मसूद कुवारी यांच्या हस्ते महिला कार्यालय व शिवणक्लासचे उद्घाटन  करण्यात आले.
      सामुदायिक विवाह सोहळे, महिला शिवणकाम प्रशिक्षण शिबीर, राष्ट्रीय दिन यांसह अनेक सामाजिक उपक्रमांसाठी ठाणे जिल्हा एकता मंच संस्था नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख, जिल्हा सचिव मतीन शेख, खजिनदार सलीम शेख, तालुकाध्यक्ष राज्जाक शेख, नजीर शेख, आयुब शेख, दिलखुश शेख, जितू चव्हाण,  शहर अध्यक्ष शाकिर पठाण, उपाध्यक्ष अजीम शेख, तालुका युवाध्यक्ष उमेश गायकवाड, असिफ अत्तार, संघटक राजेश तळवडे व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
    तसेच या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा जरीना शेख, उपाध्यक्षा गीता पवार, सचिव अश्विनी चव्हाण, कार्याध्यक्षा सलमा शेख, खजिनदार फातिमा शेख सह सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर हजर होते त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *