BREAKING NEWS
Search

आळंदी धर्मशाळा उपाध्यक्षपदी धसई गावच्या चिंतामण घोलप यांची नियुक्ती

143

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुका परमार्थिक आळंदी धर्मशाळा सन 1947 साली वैंकुठवासी ह.भ.प बबनबाबा भोईर यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. मुरबाडकरांनी दानशूरता दाखवत आजच्या घडीला आळंदी सारख्या ठिकाणी सर्व सोयी सुविधायुक्त अशी चार मजली इमारत उभारली असून, शेकडो वारकरी, भाविक मुरबाडकरांना येथे हक्काचा निवारा लाभला आहे. गेल्या चाळीश वर्षापासून या धर्मशाळेचे कामकाज व देखभाल दुरूस्तीची जबाबदारी येथील सेवानिवृत्त तालुका मास्तर असलेले ह.भ.प चिंतामण घोलप (86) हे सांभाळत आहे. त्यांच्या या सेवेचे मुल्य म्हणून मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने त्यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर टाकलेल्या या जबाबदारीचे श्रेय त्यांनी माजी आमदार गोटिरामभाऊ पवार व हरिचंद्र ईसामे यांना देत आहे. देवाच्या कामाला देह झिजविण्याची जबाबदारी शेवटच्या श्वासा पर्यंत पार पाडली जाईल अशी ग्वाही घोलप यांनी उपाध्यक्ष पदी विराजमान झाल्यावर दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *