BREAKING NEWS
Search

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांची निरा भिमा कारखान्याच्या जनावरांच्या छावणीस भेट

569
निरा नरसिंहपूर, ता.इंदापूर (-प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार) : इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याच्या जनावरांच्या छावणीला आज सोमवारी (दि.17) कारखान्याचे संस्थापक व माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी सकाळी भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शेतक-यांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
निरा भिमा कारखान्याच्या छावणीत आज अखेर 1120 लहान-मोठी जनावरे दाखल झालेली आहेत. इंदापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चा-याची आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. पशुधन जगविताना शेतकरी अडचणीत आलेला आहे. निरा भिमा कारखान्यावरील छावणीमुळे शेतक-यांना आधार मिळालेला आहे. शेतक-यांनी शासनाचे छावणीसाठी असलेले नियम पाळावेत. पाऊस पडेपर्यंत जनावरांची छावणी सुरू ठेवण्यात येईल, असे शेतक-यांशी संवाद हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी छावणीच्या ठिकाणी जनावरांसाठी जागा, पाणी, चारा, वीज, पशुवैद्यकिय सेवा आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत,अशी माहिती दिली. या भेटीप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील,अनिल पाटील, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहीते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे,मनोज पाटील, विश्वासराव काळकुटे, तानाजी नाईक,अनिल चव्हाण, माणिकराव खाडे, कैलास हांगे, डाॅ. बाळासाहेब मरगळ, संतोष जगताप,अभिजित खोरे  उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *