BREAKING NEWS
Search

इनामगाव,पुणे : येथे राष्ट्रीय सेवा योजनेतुन ग्रामस्वच्छता अभियान; मांडवगण फराटा येथिल वसंतराव फराटे पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि लोकनेते दादापाटील फराटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा उपक्रम

1034
          इनामागाव,पुणे : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि लोकनेते  दादापाटील फराटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाणे विशेष श्रमसंस्कार शिबिर सुरु आहे. काल दि. ९ ला  दुसऱ्या दिवशी गावातील बाजारतळ परिसर व सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आला.
         हे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 8 जानेवरी ते 14 जानेवरी या कालावधीत  इनामगाव येथे  आयोजित केले आहे. या शिबिरात विध्यार्थी विविध ठिकाणी ग्राम स्वच्छता करणार आहेत. या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दोन्ही महाविद्यालयाचे एकूण 125 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
         प्राचार्य अशोक वेदपाठक यांचे हसत खेळत शिकुया या विषयावर व्याख्यान झाले .यावेळी त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत कोणताही ताण तणाव न घेता अभ्यास करून यश मिळवले पाहिजे.
          व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्ष मंगलताई म्हस्के म्हणाल्या की,विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार शिबिराचे महत्व समजले पाहिजे.अशा शिबिरातुन विध्यार्थी व्यक्तिमत्व विकास होत असतो .तसेच सर्वांनी अशा शिबिरात सहभाग घेतला पाहिजे ..
           यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .अमोल पितळे यांनी शीबीराची रुपरेषा स्पष्ट केली . या शिबिरामध्ये श्रमदानातून वुक्षारोपन , ग्रामस्वच्छता, वनराई बंधारे , रक्तदान शिबिर तसेच विशेष व्याख्यानमाला कार्यक्रम करणार आहेत .
 कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक राजीव फराटे पाटील , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील , सचिव मृणाल  फराटे पाटील, प्राचार्य सुभाष शिंदे , तुकाराम मचाले , सुरज मचाले  हे उपस्थित होते .
           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अविनाश ढोबळे, प्रा. जयराम पवार,प्रा. सुरेखा देशमुख, प्रा. सुप्रिया आटोळे, प्रा. अनिता नजन,प्रा. सागर खर्डे, या सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री दिवेकर यांनी तर प्रास्तवीक माधुरी घाडगे यांनी केले तर आभार योगेश मचाले यांनी केले.
ब्युरो रिपोर्ट,(सा.समाजशील,इनामगाव,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *