( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); कर्जतच्या भोईरवाडीत भव्य गड,किल्ला स्पर्धेचे आयोजन-युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उपक्रम  - समाजशील कर्जतच्या भोईरवाडीत भव्य गड,किल्ला स्पर्धेचे आयोजन-युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उपक्रम  - समाजशील
BREAKING NEWS
Search

कर्जतच्या भोईरवाडीत भव्य गड,किल्ला स्पर्धेचे आयोजन-युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उपक्रम 

239
कर्जत,रायगड : (सा.समाजशील वृत्तसेवा) – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार,पत्रकार व ग्राहक संरक्षण संघटनेच्या वतीने यंदाच्या दिवाळीत बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संघटनेच्या कर्जत तालुक्याच्या माध्यमातून भोईरवाडी येथे भव्य गड,किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी ही या स्पर्धेस मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
       या वर्षी भोईरवाडीत आकर्षक व ऐतिहासिक देखावे सजावट सादर करणाऱ्या भव्य गड,किल्ला स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक २२२२/- रुपये, प्रीतेश बोंबे,रायगड जिल्हा अध्यक्ष युवा क्रांती पोलिस मित्र संघटना, द्वितीय पारितोषिक ११११/- रुपये शुभम मोकल रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवा क्रांती पोलिस मित्र संघटना,तृतीय पारितोषिक ​५५५/- रुपये,भूषण कडू कर्जत तालुका अध्यक्ष​, युवा क्रांती पोलिस मित्र संघटना​,चतुर्थ पारितोषिक ​५०१/- रुपये,सचिन लोहट कर्जत शहर संपर्क प्रमुख​, युवा क्रांती पोलिस मित्र संघटना​ यांचेकडून देण्यात येणार असून उत्कृष्ट गड,किल्ले ठरणाऱ्या बक्षीस पात्र विजेत्यांचा सन्मान रायगड भूषण पुरस्कृत शिवशाहीर गणेश ताम्हाणे, शिवव्याखयाते अक्षय तिखंडे, शुभम मोकल रायगड जिल्हा उपाध्यक्ष पोलिस मित्र संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत ​होणार असल्याची माहिती ​युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार,पत्रकार व ग्राहक संरक्षण संघटने​चे  कर्जत तालुका संपर्क प्रमुख नितिन वाव्ह​ळ यांनी सा.समाजशिलशी बोलताना दिली. 
                                     
​        तर या किल्ले बनवा स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या विजेत्यास स्मृती​,सन्मानचिन्ह चिन्ह रायगड भूषण पुरस्कृत शिवशाहीर गणेश ताम्हाणे ​यांजकडून देण्यात येणार ​असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे ​रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश लोहट​, नितीन वाव्ह​ळ, कर्जत तालुका संपर्क प्रमुख​, सचिन लोहट,कर्जत शहर संपर्क प्रमुख​ यांनी दिली आहे.संघटनेच्या माध्यमातून कर्जतच्या भोईरवाडी सारख्या ग्रामीण भागात या भव्य गड,किल्ला स्पर्धेचे आयोजन ​करण्यात आले असून आकर्षक बक्षिसे ही ठेवण्यात आली असल्याने अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका युवा क्रांती पोलीस मित्र,माहिती अधिकार,पत्रकार व ग्राहक संरक्षण संघटनेच्या वतीने​ आयोजित करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे  संघटनेचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे,राष्ट्रीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष ह.भ.प. नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,पश्चिम महाराष्ट्र संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे यांनी कौतुक करीत कर्जत तालुका टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

​     




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *