BREAKING NEWS
Search

कवठे येमाईच्या उपसरपंच पदी एम. डी. रोकडे यांची बिनविरोध निवड 

343
कवठे येमाई,शिरूर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील मोठी लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज दि.०२ ला मधुकर दत्तात्रय रोकडे यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच उत्तमराव जाधव यांनी स्वेच्छेने या पदाचा राजीनामा दिल्याने एम. डी. रोकडे यांना उपसरपंचपदी संधी मिळाली.
      शिरूर पंचायत समितीचे शिवसेनेचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच शोभा हिलाळ,विठ्ठलराव गावडे,रामदास पोकळे,हरिभाऊ रोकडे यांनी या निवडीबद्दल रोकडे यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *