BREAKING NEWS
Search

कवठे येमाईच्या महिलांची हरिचंद्र गडास भेट,वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम राबवत पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

1144
कवठे येमाईच्या महिलांची हरिचंद्र गडास भेट,वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम राबवत पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश – ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांच्या पुढाकाराने उपक्रम 
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासचाही साक्ष  व आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणारे आणि परकीय सत्तेचे वार आपल्या अंगावर झेलूत महाराष्टाचे वैभव जिवंत ठेवणाऱ्या गड, कोटांपैकीच एक असलेल्या हरिचंद्र गडास कवठे येमाई येथील १२ महिलांनी नुकतीच हरिचंद्र गड व भंडारदरा धरणास भेट दिली.हरिचंद्र गडावर स्वच्छता मोहीम व परिसरात बिया,वृक्षारोपण राबवित पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. हा उपक्रम कवठे येमाईच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.
कवठे येमाई येथील महिला जिजाऊ ग्रुप व श्री शंभुसाम्राज्य सेना यांच्या वतीने किल्ले हरीचंद्र गडावर ही मोहीम या महिलांनी अनोख्या पद्धतीने राबवली. गडाचे पवित्र राखण्यासाठी परिसरात स्वच्छता करण्यात आली.  झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आज सर्वत्रच दिला जातो. परंतु एवढ्या उंचावर झाडे घेऊन जाणे म्हणजे अवघडच परंतु या महिलांनी आंबा, चिक्कू,सीताफळ,बोर,अशा विविध प्रकारच्या झाडांच्या बियांची खड्डे खणून लागवड करीत नुसतीच गडावर भेट( ट्रेक) न करता पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश दिला. उपस्थित महिलांनी गडावर छञपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय अशी गर्जना करीत परिसर दुमदुमून सोडला. याच बरोबर भंडारदरा धरणास भेट देत तेथील जलाशयात नावेतून फिरण्याचा व परिसरातील अद्वितीय निसर्ग सौंदर्य पाहण्याचा आनंद ही अनुभवला.या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी,साधना पोकळे,अश्विनी धर्माधिकारी,मीना डांगे,सविता इचके,रंजना कुंभार,रेखा कांदळकर,रुपाली सांडभोर,लता पोकळे,सीमा पोकळे,प्रतीक्षा कदम,श्रावणी रत्नपारखी,साई धर्माधिकारी यांनी सहभाग घेतला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *