BREAKING NEWS
Search

कान्हूर मेसाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात पण साधेपणात साजरी

573

  शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पण साधे पणात साजरी करण्यात आली. गावच्या सरपंच सौ. चंद्रभागा खर्डे उपसरपंच संदीप तांबे, ग्रामविकास अधिकारी कुवरलाल घासले,अजय खर्डे, कक्ष अधिकारी मंत्रालय, वैभव जाभाडे अधिकारी मंत्रालय यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी गावचे पोलीस पाटील कमलेश शिर्के, माजी पोलीस अधिकारी विठ्ठल खर्डे, माजी सरपंच दादा खर्डे, शिवसेना शिरूर आंबेगाव तालुका प्रमुख शहाजीराव दळवी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजू घोलप, सोपान पुंडे, दिपक पुंडे, आशिया तांबोळी, सुरेखा पुंडे, शर्मिला तळोले, राजश्री रूपनेर, योगेश पुंडे, संगिता पुंडे व सन्मित्र बौद्ध संघाचे जेष्ठ कार्यकर्ते कचरू उबाळे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष भरत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाळू लोखंडे, सुरेश मोहिते, गणेश मोहिते, अनिल उबाळे, बाळू उबाळे, आनंद उबाळे, सुनील जाधव, भागवत उबाळे,फनसाबाई उबाळे, हरुबाई लोखंडे, संगिता गायकवाड, स्वाती गायकवाड, अलताफ तांबोळी इत्यादी उपस्थित होते.
कान्हूर मेसाई येथील ग्रामपंचायत प्रारंगणात आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.सन्मित्र बौद्ध संघ व बाराभाऊ बलुतेदार मंडळ कान्हूर मेसाई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम, सोशल डिस्टनसिंगचे पालन यावेळी करण्यात आले.
प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व प्रार्थना करण्यात आली. यावेळी सध्या सर्वत्र असलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होवो अशी प्रार्थना करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत कान्हूर मेसाई यांच्या मार्फत समाजमंदिर दुरुस्ती कामाचे भूमिपूजन सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
मागील वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कान्हूर मेसाईत अत्यंत साधेपणात साजरा करण्यात येत असल्याची माहिती ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्र अध्यक्ष भरत गायकवाड यांनी साप्ताहिक समाजशीलशी बोलताना दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *