BREAKING NEWS
Search

केदुर्ली गाव एका सैनिका मुळे झाले एकत्र ; भारतीय सैनिकचा मिरवणूक काढून केला नागरी सत्कार

454
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील केदुर्ली गावातील सागर म्हारसे हा शेतकरी कुटुंबातील तरुण एक वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाला हैदराबाद येथून प्रशिक्षण घेऊन तो नुकताच सुट्टी वर आला होता. मात्र कोरोना काळ असल्याने त्याला कुणीही शुभेच्छा देऊ शकले नसल्याने प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या सागराचा केदुर्ली ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करत पुन्हा देशसेवे जाताना शुभेच्छा दिल्या. यावेळी 25 वर्षांनी केदुर्ली गाव सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, वैयक्तिक हेवेदावे विसरून या वेळी एकत्र आल्याने सागरने सर्वांचे आभार मानले.
यावेळी सागरचे वडील बाळू म्हारसे व त्याच्या आईचाही सत्कार करण्यात आला. सागर सोबतचच सैन्य दलात रुजू झालेले अनिकेत अढाईगे याचे वडील समाजशील न्यूज चे जेष्ठ पत्रकार जयदीप अढाईगे, कचकोली येथील सैनिक पालक देसले यांचाही सत्कार करण्यात आला. 25 वर्षांनी सर्व गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी गावचे उपसरपंच काळूराम म्हारसे यांची महत्वाची भूमिका होती. तर देवीदास म्हारसे, योगेश म्हारसे, विकास म्हारसे यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सागरचे शिक्षक सुनील भोईर यांनी सागराचा अभिमान असल्याचे सांगितले. तर गावचे जेष्ठ नागरिक लक्ष्मण म्हारसे यांनी सांगितले की, ” गावात मुले मुली वकील, डॉक्टर होऊ शकतात पण सैनिक होण्याची जिद्द सर्वांत नसते. त्यामुळे एक सैनिकामुळे गावच मान वाढला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदीप अढाईगे यांनी आपला मुलगाही सैन्यात असल्याचा अभिमान असल्याचे सांगत देशसेवेसाठी जिद्द ,चिकाटी व मनोधैर्य कायम ठेवावे लागते यात तालुक्यातील सागर व अनिकेत यांनी सातत्य ठेवल्याने आज त्यांना सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची संधी मिळाली. सागर यास पुन्हा हैदराबाद येथे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नागरिसत्कारासाठी गावातील लहान मुलांसह महिला वर्ग व तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील पत्रकार संजय बोरगे, सचिन पोतदार, निलेश अहिरे, जीवन शिंदे यांनीही सागर यास शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *