( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी यात्रा बंद राहणार - सहाय्यक जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी - समाजशील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी यात्रा बंद राहणार - सहाय्यक जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी - समाजशील
BREAKING NEWS
Search

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी यात्रा बंद राहणार – सहाय्यक जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी

513
            भीमाशंकर,पुणे : (सिताराम काळे,सा.समाजशील वृत्तसेवा) –  श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी भरणारी श्रावण महिन्यातील यात्रा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच रद्द झाली आहे.  भीमाशंकर येथील मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी व पर्यटनासाठी येऊ नये. तसे आल्यास संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवरआज बुधवार दि. ८ रोजी मंचर येथील अस्मिता भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, घोडेगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यापासुन श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. श्रावण महिना मंगळवार दि.२१ पासुन सुुरु होणार आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी येथे येऊ नये. मंदिर बंद असुन पर्यटनही बंद आहे. भाविकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे.अन्यथा तेथे येणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.

    गजानन टोम्पे  –  उपविभागीय पोलिस अधिकारी

“श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात दर्शनासाठी,पर्यटनासाठी कोणीही येवु नये. डिंभे व पालखेवाडी येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. जर कोणी या भागात फिरताना आढळल्यास गाडी जप्त करुन संबधितावर गुन्हे दाखल केले जाणार असुन प्रशासनास सहकार्य करावे”. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *