BREAKING NEWS
Search

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण

203

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : रामलिंग महिला उन्नती बहु.सामाजिक संस्था व रामलिंग महीला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर यांचा सन्मान करून, अनेक मान्यवर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार व्यक्त केले. यावेळी शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आपले विचार मांडले. यावेळी किरण पिंगळे, अध्यक्ष कार्यकारी समिती शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, तेजस फडके, कार्याध्यक्ष – शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, अर्जुन बढे – प्रसिद्धीप्रमुख शिरूर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघ यांना वरील पद मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान असून, त्यांच्यामुळेच आज महिला पुढे असल्याचे मत व्यक्त करत त्यांचा जयंती निमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंजली माने मॅडम यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रामलिंग महिला पतसंस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर ग्रामीण चे सरपंच नामदेव जाधव, मा.सरपंच रामदास जामदार, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवार, उपसरपंच यशवंत कर्डिले, रमेश चव्हाण, मानव विकास परिषद प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, युवा उद्योजक शिवाजी दसगुडे,आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्षा – शशिकला काळे , सुवर्णा सोनवणे,लता ना, मीना गवारे,वैशाली बांगर,राणी शिंदे,dr वैशाली साखरे, छाया हारदे,उषा वेताळ, सालेहा शेख,ललिता पोळ,प्रिया बिरादार,नीलम शिरसागर, सतेजा भाभी, संध्या गायकवाड , प्रकाश ठूबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन युवा उद्योजक शरद पवार यांनी केले तर सर्वांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *