BREAKING NEWS
Search

खड्यांमुळे माळशेज घाट बनला धोकादायक ; खड्यातून वाट काढताना चालकांची दमछाक

281
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कल्याण- मुरबाड- नगर राष्ट्रीय महामार्ग 61 मुरबाड हद्दितील माळशेजघाटाच्या दुरुस्ती करीता दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. तरी देखील घाटरस्ता हा कायम मृत्यूचा सापळा बनलेला पहायला मिळत आहे. घाटात संध्याकाळ 7 ते सकाळी 8 वाजेपर्यंत दाट धुके असल्याने वाट हरवली जाते. त्यातच कधी ही दरड कोसळण्याच्या भीती असे असताना घाटातील रस्त्यावर खड्यांमुळे झालेली चाळण व पडलेल्या खड्ड्यात साचलेले पाणी यांमुळे खड्यातुन वाट काढताना चालक वर्गाची चांगलीच दमछाक झालेले पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत घाटातून प्रवास करणे म्हणजे मृत्युुला आमञंण देण्या सारखे झाले आहे.
    पूर्वी कल्याण – मुरबाड – नगर राष्ट्रीय महामार्ग हा 222 क्रमांक म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर याला 61 क्रमांक देण्यात आला. मात्र क्रमांक बदलला पण कामात उंची नसल्याने हा दर्जाहीन रस्ता बनवविला गेला आहे. घाटात दरवर्षी धोकादायक कड्यावर जाळ्या बसवणे, रस्ता काँक्रीट करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, खड्डे भरणे यावर कोट्यावधीचा खर्च केला जातो. या सपुंर्ण घाटात मे महीन्यात खड्डे भरण्याचे काम केले होते. माञ पावसाचा तपास नसला तरी पहिल्याच पावसाच्या सरीत हा रस्ता आहे की स्विमिंग टँक ?  हा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. या अवघड घाटातुन दरड कोसळण्याच्या भितीतुन लवकर बाहेर पडायचा प्रयत्न चालक वर्ग करतो. मात्र खड्ड्याच्या जाळ्यातून खड्डे चुकवत वाट काढताना   वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या घाटातून राञीच्या सुमारास शेकडो मालवाहतुक करणा-या वाहनांची ये -जा असते. रस्त्यावर खड्डे, डोक्यावर दरड कोसळण्याच्या स्थितीत असलेले कडे, घनदाट धुके घाटात वाहन चालवणे म्हणजे मृत्युला सोबत घेऊन प्रवास करण्यासारखे आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याचा क्रमांक बदलला पण रस्त्याची सुधारणा करायला विसरलं की काय? हा सवाल होत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्याच्या सुचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *