BREAKING NEWS
Search

गरीब कुटुंबातील आठ वर्षीय बालिकेच्या उपचारासाठी मदतीची गरज – मेंदूतील रक्तस्रावामुळे पुण्याच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल 

827
 
 शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोरडवाहू असलेल्या मूळ मिडगुलवाडी गावचे पण पोटाची खळगी भरण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे मोलमजुरी करून चरितार्थ चालविणारे सौ रेश्मा व दीपक मिडगुले या दाम्पत्याला दोन मुलीच आहेत.पहिली मुलगी आर्या दहा वर्षांची असून ती मतिमंद आहे तर दुसरी आठ वर्षांची चिमुकली अक्षदा खडकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ३ रीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १८ जुलैला छोट्या अक्षदाला ताप आल्याचे निमित्त झाले स्थानिक पातळीवर उपचार झाले पण तिची खालावत चाललेली तब्येत पाहून तिला त्याच दिवशी पुण्याच्या के.इ.एम. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
         अक्षदाच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने व शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होत तिला झटके येऊ लागल्याने त्यावर मागील पाच दिवसांपासून तातडीने रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. उपचारासाठी मुलीची आत्या ज्योती धुमाळ व त्यांच्या पतीने तात्काळ ५० हजार रुपये मदत केली तर अक्षदाचे वडील दीपक मिडगुले यांनी खडकवाडीतून अक्षदाच्या उपचारासाठी सुमारे एक लाख रुपये हात उसने घेत जमा केले.अक्षदावर उपचार,औषधे व इतर असा सुमारे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून समाजातील दानशूर व्यक्ती सेवाभावी,समाजसेवी संस्था यांनी तात्काळ आर्थिक मदतीचा हात द्यावा असे आवाहान मुलीच्या आई वडिलांनी,कान्हूर मेसाईचे सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे दळवी व अक्षदाची आत्या ज्योती धुमाळ यांनी सा.समाजशीलशी बोलताना केले आहे.
          अत्यंत गरीब कुटुंब असलेल्या रेश्मा व दीपक मिडगुले यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या अक्षदाला विविध स्तरातील दात्यांकडून मिळणाऱ्या मदतीतूनच या आजारावरील उपचारातून बरी होण्यास नक्कीच मदत होणार असून अक्षदाच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या नागरिकांनी दीपक फक्कड मिडगुले यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र,पाबळ शाखेच्या  Dipak fakad midgule,BRANCH :PABAL173,Account No:60263606457,IFSC Code:MAHB0000173,Account type:maha sarvajan savings Bank यावर व  9960201971 फोन पे गुगल पे नंबरवर आर्थिक मदत पाठविण्याचे आवाहन ज्योती धुमाळ,शहाजी दळवी व अक्षदाच्या आई वडिलांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *