BREAKING NEWS
Search

गृहविलगीकरणामध्ये न राहणा-या व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार – सहायक जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी  

463

            भीमाशंकर,पुणे : (सिताराम काळे,सा.समाजशील वृत्तसेवा)  –                                                                            आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील गावांमधून पुणे, चाकण, रांजणगाव किंवा इतर कोणत्याही औदयोगिक क्षेत्रामध्ये नोकरी तसेच इतर कोणत्याही कारणास्तव दररोज ये-जा करणा-या व्यक्तिंनी स्वतः व आपले कुटुंब गृहविलगीकरणामध्ये ठेवावे, या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ति आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचा इशारा जुन्नर, आंबेगाव उपविभागाचे सहायक जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
मुंबई, पुणे तसेच इतर प्रतिबंधित क्षेत्रामधून जे नागरिक गावी येत आहेत. त्यांना  १४ दिवस गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात यावे.  तसेच नोकरीनिमित्त दररोज तालुक्यात ये-जा करणा-यांनीही गृहविलगीकरणामध्ये कुटुंबासह ठेवणे, या संबंधित व्यक्तिंच्या नोंदी पोलीस पाटील यांनी घेवून तालुका आरोग्य अधिकारी व गावचे तलाठी यांना माहिती दयावी. विविध व्यावसायिक कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करावे. तर संबंधित कर्मचारी यांची वैदयकीय तपासणी करण्याची जबाबदारी कंपनीची राहिल.
जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करणे बंधकारक राहिल. याचे उल्लंघन करणा-यांवर नियुक्त केलेली ग्रामदक्षता समिती पाचशे रूपयांचा दंड वसूल करेल. विविध व्यापारी दुकानांमध्ये येणारे ग्राहक सोशल डिस्टिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून घेण्याची सर्व जबाबदारी संबंधित दुकानदारांची राहिल. लग्न समारंभाच्या ठिकाणी शासन नियमानुसार नागरिक उपस्थित राहतील. तसेच लग्न समारंभामध्ये व इतर कोणत्याही स्वरूपाची मिरवणूक काढता येणार नाही, आदि सूचना संबंधित शासकीय विभागांना कोरोना आजार नियंत्रण उपाययोजना राबविणे व जिल्हाधिकारी यांचे आदेषान्वये सहायक जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *