( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); घोडेगाव मध्ये कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण - समाजशील घोडेगाव मध्ये कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण - समाजशील
BREAKING NEWS
Search

घोडेगाव मध्ये कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

190
नेवासा, अहमदनगर (समाजशील वृत्तसेवा) :  घोडेगाव ता. नेवासा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना बेल्हेकर समाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कर्यानुभव कार्यक्रम (RAWE & AIA) अंतर्गत कृषिदूतांनी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषिदुत – गवळी विकास, गरड प्रदीप, गिरमकर ओम, खिलारी सचिन, पेहेरे सचिन यांनी घोडेगाव येथे भविष्यातील व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेता गावातील शेतकरी फळबाग उत्पादक, दूध उत्पादक तसेच गावातील प्रगतशील शेतकरी व  ग्रामस्थ यांना मधमाशीपालन व रोजगार निर्मिती, मधमाशी पालनामुळे शेती उत्पादनाला होणारा फायदा, मधमाशींच्या विविध प्रजाती, कार्यपद्धती व  जीवनप्रणाली, मधमाशी पालनासाठी आवश्यक असणारे साहित्य, मधमाशी  हातळताना व स्थलांतर करताना घ्यावयाची काळजी, मधमाशींचे हंगामानीहाय व्यवस्थापन, मधमाशी पासून मिळणारे विविध पदार्थ, मधमाशी हाताळणी व पाहणी, मध प्रक्रिया व मधाच्या विविध तपासण्या याबाबत सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी प्रा. मनोज माने व कीटकशास्त्र विभागाचे प्रा. उमेश महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *