BREAKING NEWS
Search

घोडेगाव येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्व

97
नेवासा, अहमदनगर (समाजशील वृत्तसेवा) : घोडेगाव ता. नेवासा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या सुलोचना बेल्हेकर समाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कर्यानुभव कार्यक्रम (RAWE & AIA) अंतर्गत कृषिदूतांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व बीजप्रक्रियेचे महत्व विषद केले. या कार्यक्रमाअंतर्गत कृषिदुत – गवळी विकास, गरड प्रदीप, गिरमकर ओम, खिलारी सचिन,पेहेरे सचिन यांनी घोडेगाव येथे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्व, बीजप्रक्रिया कशी करावी, बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, बिजप्रक्रियेचे फायदे- तोटे तसेच बीजप्रक्रिये साठी वापरायचे औषधे, त्याचे प्रमाणे या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधन्यात आला असुन सेंद्रिय शेती, झिरो बजेट शेती, शेती पुरक व्यवसाय, गांडुळखत प्रकल्प, आधुनिक शेती , शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, औषधे फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.मनोज माने व कार्यक्रम समन्वयक प्रा. डि. एन.भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *