BREAKING NEWS
Search

चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे बाबुराव नगर येथे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या वतीने जनजागृती मोहीम

243
रामलिंग, ता.शिरूर (-प्रतिनिधी,गणेश बोरगे) : बाबुराव नगर येथे वाढत्या चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे बाबुराव नगर येथे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच नामदेव जाधव यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे अहमदनगर महामार्गालगत बाबुराव नगर हे उपनगर वसलेले आहे. या भागात काही प्रमाणात स्थानिक तर मोठ्या प्रमाणावर रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार वर्ग वास्तव्यास आहे. या उपनगराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र आहे. अशा अवस्थेत सध्या या उपनगराला गुन्हेगारीचा प्रश्न सतावू लागला आहे. यावर उपाययोजना झाली पाहिजे, याबाबत मनोगत संतोष मोरे यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काही घटनांमध्ये महिलांना चाकू लावून लुटण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे या उपनगरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यावेळी महिलांनी स्वतः धाडस  दाखऊन स्वतःचे रक्षण केले पाहिजे. अनोळखी व्यक्तीकडून कोणतेही सामान खरेदी करू नये. सोन्याचे दागिने घालून सकाळी फिरायला जाऊ नये याबाबत रामलिंग महीला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत यांनी ही बाबुराव नगर येथे पोलीस चौकी व्हावी यासाठी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत साहेब यांना निवेदन देत यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करत पोलीस चौकी होण्याबाबत नक्कीच प्रयत्न करेल. सद्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी आहे ते वाढले की नक्की हे काम होईल. तसेच प्रत्येक वार्ड मध्ये सुरक्षा दल स्थापन करून रात्रीची गस्त घातली तर चोरीचे प्रमाण कमी होईल असे त्यांनी सांगितले. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच महिला दक्षता समिती पण महिलांसाठी छान काम करत असून, महिलांनी नेहमी अनोळखी व्यक्ती पासून सावध रहाणे, प्रत्येक सोसायटी मध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविने, यामुळे चोर शोधण्यास तसेच चोरीला आळा बसण्यास मदत होईल असे राऊत यांनी सांगितले.

बाबुराव नगर येथे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. यामध्ये राज्यातील तसेच परराज्यातील काही गुन्हेगारी मंडळींचाही समावेश असण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. याबाबतही आपण लक्ष घालावे अशी विनंती यावेळी उपस्थित महिलांच्या वतीने करण्यात आली. तसेच याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत साहेब यांनी गृहसोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना याबाबत माहिती देण्यास सांगितली. यावेळी गायकवाड भाऊसाहेब, सदस्य यशवंत कर्डिले, सागर घावटे, तुषार दसगुडे, हिरामण अप्पा जाधव, अनिल लोंढे,घावटे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा.सदस्य नितीन बोऱ्हाडे यांनी केले.  उपसरपंच अभिलाष घावटे यांनी सर्वांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *