BREAKING NEWS
Search

ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य दिंडी सोहळा संपन्न

1014

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील इंटरनॅशनल स्कूल मध्ये शनिवारी दि. ९ रोजी भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. पालखीची मिरवणूक काढत विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा मृदुंग व टाळ या वाद्यांच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत पायी वारीचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे पालकसुद्धा या वारीमध्ये सहभागी झाले होते. तसेच विठ्ठलाच्या भक्ती गीतांवर उत्कृष्ट असे नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. सामाजिक भान जपत पथनाट्याद्वारे पर्यावरण,स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला वसुंधरेची सेवा हीच खरी विठ्ठल पूजा हा मोलाचा संदेश दिला. त्यानंतर विनोदी भारुड सादर करत अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाला हात घातला. उपस्थित पालकांनी मुलांच्या अभिनयाचे व सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. संथ पावसाच्या धारा चालू असताना सुद्धा मुलांनी उत्तम असे सादरीकरण केले व पालकांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानगंगा शाळेच्या ढगे मॅडम तसेच अनाप मॅडम, वैशाली रणसिंग मॅडम या शिक्षिकांनी केले होते. ज्ञानगंगा शाळेच्या प्रिन्सिपल रुपाली जाधव, संस्थेचे सीईओ नितीन घावटे सर यांचे मार्गदर्शन लाभले व संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे, सचिव सविता घावटे आणि संचालक सुधीर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. इतर शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *