BREAKING NEWS
Search

ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचा शिवराज नागवडे मंथन परीक्षेत राज्यात तिसरा

919
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी शिवराज संदीप नागवडे याचा मंथन २०२३-२४ या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत राज्यात तिसरा क्रमांक आल्यामुळे विद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी विद्यालयातर्फे त्याचा व आई वडिलांचा घरी जाऊन सत्कार करण्यात केला. तर त्याचे वडील संदीप नागवडे यांनी विद्यालयातील त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले व शिवराजचे भरभरून कौतुक केले.तसेच विद्यालयातील अनेक विद्यार्थी या मंथन परीक्षेत चमकले असून, जिल्हा/विभागस्तरीय बक्षीसपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे :
इयत्ता पहिली
१) अनन्या उमेश जाधव (सहावा क्रमांक)
इयत्ता दुसरी
१) प्रणव भाऊसाहेब बर्वे(सहावा क्रमांक)
२) ईशानी पंकज निकम( आठवा क्रमांक)
३) स्वरा दत्ता पडवळ ( आठवा क्रमांक)
४) स्वराली राहुल लोणकर ( आठवा क्रमांक)
५) स्वरा निलेश मुसळे( नववा क्रमांक)
६) आरुष चंद्रकांत जाधव( नववा क्रमांक)
इयत्ता पाचवी
१) भार्गवी राऊत
२) आर्या सरोदे
३) तनिष्का शिंदे
४) दक्ष शेगोकर
इयत्ता आठवी 
संस्कृती प्रशांत राऊत
  संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेराम घावटे, संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *