BREAKING NEWS
Search

टिक टॉक सह यूसी ब्राऊजर, शेअर इट व इतर ५९ चिनी अॅप्सवर बंदी ; केंद्रसरकारचा मोठा निर्णय 

691

नवी दिल्ली : टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदयाच्या कलम ६९ अ नुसार केंद्रशासनाने अधिकार वापरून चिनी मोबाईल अप्लिकेशनवर बंदी घालून एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. तसेच Helo, Wechat, ucBrowser, Share It यांसारख्या ५९ ऍप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारनं एक पाऊल उचललं जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *