BREAKING NEWS
Search

डॉक्टर डे व आषाढी एकादशी निमित्ताने शिरूर मधील डॉक्टरांचा तुळशीचे रोप व कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मान 

543

शिरूर (देवकीनंदन शेटे, संपादक: १ जुलै रोजी अंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टर डे बाबत सोशल मीडियावर हि मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. कोरोनाच्या महामारीत लोकांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पडत आहे. अनेक डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग ही झाला आहे. तरीदेखील एका योद्ध्याप्रमाणे कोरोनाच्या या लढाईत सामील झाले आहे. अशा या कोरोना योद्धयांचा सन्मान शिरूर मधील अखिल भारतीय मराठा महासंघानी शिरुर यांनी केला आहे. डॉक्टर डे  व आषाढी एकादशी या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघानी शिरुर शहरामध्ये डॉक्टरांना यावेळी कोरोना योद्धा सन्मान पत्र व तुळशीचे रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्षसंभाजीराजे कर्डीले, महिला तालुकाध्यक्षवर्षाताई काळे, प्रसिद्धीप्रमुखअनिल सोनवणे,शहराध्यक्षअविनाश जाधव,महिला शहराध्यक्षवैशालीताई गायकवाड, सोशल मीडिया शहराध्यक्ष अविनाश घोगरे, योगेश महाजन,अतुल भोईटेव अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम सोशल डिस्टिंग नियमांचे पालन करून, मास्क व सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *