BREAKING NEWS
Search

तळेगाव ढमढेरे,पुणे : तळेगाव ढमढेरे येथील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे उपोषण मागे

955
           तळेगाव ढमढेरे,पुणे :  येथील शासकीय गायरान जागेत अतिक्रमण करून सुरू असलेले बांधकामाविरोधात तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले.  उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी ग्रामविकास अधिकारी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये कल्पना गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
              सदर गायरान गट क्रमांक ४१७५/१अ ग्रामपंचायत मिळकत न.५ असून या मिळकतीत कल्पना संजय गायकवाड यांनी अनाधिकृतपणे बांधकाम चालू केलेले होते याबाबत ग्रामपंचायतीने त्यांना वेळोवेळी नोटीसा दिल्या होत्या.  तसेच ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेची सदरची जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्याबाबत चा ठराव झालेला होता.  तरीही त्यांनी अद्याप काम थांबवले नव्हते.  तसेच त्यांनी ग्रामपंचायतीची किंवा नगर रचना खात्याची पूर्व परवानगी घेतली नव्हती.  म्हणून नियामचे उल्लंघन केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये हजर राहून सरकारतर्फे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी फिर्याद दिली असून ग्रामपंचायत मिळकत नंबर ५ मधील जागा शासकीय गायरान म्हणून ७.८९.९० हेक्टर आर असून त्यातील अंदाजे १३७६ स्क्वेअर फुट ही जागा कल्पना संजय गायकवाड सिटी सर्वेला माझे नाव आहे असे सांगून बांधकाम करत आहेत.  सदरचे बांधकाम वारंवार नोटिसा देऊनही अद्याप पर्यंत बांधकाम चालूच ठेवले होते. सदर दिलेले जागेवरील बांधकाम अद्यापपर्यंत थांबले नाही म्हणून शासकीय परिपत्रक क्रमांक जमीन ०७/२०१३/प्र.क्र.३७४/ज-१.दि १० ऑक्टोबर २०१३ व ०३/२००९ प्र.क्र.१३/ज-१ दि ७ सप्टेंबर २०१० शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंधक निष्काशित करणे असा शासनाचे परिपत्रक असताना भा.द.वि.क्र.१८८ प्रमाणे फिर्याद देऊन शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या समोर श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्ते  व माजी उपसरपंच महेंद्र पवार, सुधीर ढमढेरे, अशोक रासकर, संतोष ढमढेरे, विजय घुले, गणेश गुंड, पोपट ढमढेरे, गोरक्षनाथ कऱ्हेकर, अमित ढमढेरे  हे या प्रश्नी उपोषणास बसले होते. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायतीला केलेल्या पाठपुराव्याने न्याय मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, डॉ. राजेंद्र ढमढेरे, काकासाहेब जेधे, संदीप ढमढेरे यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
– प्रतिनिधी,जालिंदर आदक,(सा.समाजशील,तळेगाव ढमढेरे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *