BREAKING NEWS
Search

तांदळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुवर्णा संजय कळसकर यांची बिनविरोध निवड  

881

  तांदळी,शिरूर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पूर्व भागातील तांदळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुवर्णा संजय कळसकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.  सरपंच चांगुणा दत्तात्रय गदादे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.      दुसऱ्या सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून उपसरपंच विजय गोकुळ कळसकर यांनीआपल्या पदाचा राजीनामा दिला होता.  यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे, मेजर सुरेश नलगे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव खोरे, सोसायटीचे चेअरमन मोहनराव गदादे, दत्ता आणा गदादे,, जयसिंगराव कळसकर, दत्तात्रय खोरे, कळसकरवाडी सोसायटी चेअरमन संजय कळसकर, संतोष बनकर, गणेश गदादे उपस्थित होते निडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक कोळेकर यांनी काम पाहिले.
तांदळी गावच्या उपसरपंचपदी आज नव्याने निवड झालेल्या सुवर्णा कळसकर यांचा ग्रामपंचायत सदस्य स्मिता गदादे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर मावळते उपसरपंच विजय कळसकर यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य शंकरभाऊ गदादे यांच्या हस्ते करण्यात आला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *