BREAKING NEWS
Search

धानिवली टेक्नोक्राप्ट इंडस्ट्रीज चा पावर डिव्हिजन अचानक बंद ; स्थानिक कामगारांवर बेकरीचे संकट

1068

नवीन कामगार धोरणाची अंमलबजावणी करणारी मुरबाड मधील पहिली कंपनी

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी इंडस्ट्रीज असलेल्या टेक्नोक्राप्ट इंडस्ट्रीज (इ ) लि. या कंपनीने आपलं पावर डिव्हिजन 25 सप्टेंबर 2020 पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या पावर डिव्हिजन मध्ये काम करणाऱ्या स्थानिक कामगारांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. कंपनीने कामगारांना कंपनीत नोटीस लावण्यापूर्वीच कायद्यानुसार थकबाकी, भरपाई च्या निवेदनासह सेवा समाप्तीपत्र व धनादेश त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवून कामगारांना धक्का दिला आहे. कामगारांना दिलेल्या नोटीसीत सर्व कामगारांना कळविले हे की,” दि 27 जुलै 2020 XXIV -B या सूचनेनुसार दि 25 सप्टेंबर 2020 पासून पावर प्लान्ट कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. या नोटीस मुळे स्थानिक कामगार नोकरी गेल्याने हतबल झाले आहेत. या पावर प्लान्ट मध्ये धानिवली गावातील 35 व परिसरातील 23 असे एकूण 58 कामगार कार्यरत होते. एकाच गावात एकाच वेळेस 35 तरुण बेकार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या बाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता याची माहिती आपणास सोमवारी 28 सप्टेंबर रोजी मिळेल असे सांगण्यात आले. मात्र केंद्र सरकारच्या नवीन कामगार विधेयक काल संसदेत पारित होताच नव्या कायद्यानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कंत्राटी ठेवण्याची मुभा त्याच प्रमाणे तीनशे पेक्षा कमी कामगार असतील तर त्यांना कधीही कामावरून काढू शकतात या नव्या धोरणानुसार हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. नव्या कामगार विधेयक कायद्या नुसार मुरबाड मधील असा निर्णय घेतलेली ही पहिली कंपनी असल्याचे आत्ता बोलले जात आहे. याबाबत कामगार वर्गाशी चर्चा केली असता आम्ही कुणीही राजीनामे दिले नसून कंपनीने आम्हाला सक्ती ने काढून टाकले आहे. आम्ही आमच्या न्याय हक्का साठी लढू अशी प्रतिक्रिया दिली, मात्र कंपनीच्या या  निर्णयामुळे मुरबाड मधील कामगार वर्गातून सरकारच्या नवीन कामगार विधेयका विरोधात संताप व्यक्त होत असून, सरकार गरिब कामगारांचा विचार न करता उद्योगपतींसाठी विचार करत असल्याच्या टीका होत आहे.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *