( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); धामारी जवळ टेम्पो-दुचाकीचा अपघात - तीन ठार - रात्री आठची घटना - समाजशील धामारी जवळ टेम्पो-दुचाकीचा अपघात - तीन ठार - रात्री आठची घटना - समाजशील
BREAKING NEWS
Search

धामारी जवळ टेम्पो-दुचाकीचा अपघात – तीन ठार – रात्री आठची घटना

1500

       शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) –  मित्रासह दुचाकीवरून आपल्या आईस शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे सोडावयास निघालेल्या दुचाकीस रात्री आठच्या दरम्यान धामारी नजीक झालेल्या टेम्पो -दुचाकीच्या अपघातात खडकवाडी ता. आंबेगाव जि.पुणे येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संकेत दिलीप डोके, विजया दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे असे तीन जण या अपघातात ठार झाले आहेत.

        बेल्हा – जेजुरी महामार्गावरून संकेत डोके हा त्याची आई व एका मित्रासह त्याच्या ताब्यातील एम एच १४ एच आर ७०७३ या दुचाकीहून धामारी कडून शिक्रापूरकडे जात असताना शिक्रापूरकडून आलेला टँपो एम एच १४ जि यु ६८८० या वाहनाची  डोके यांच्या  दुचाकीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. दुचाकी वरील तिघांना गंभीर मार लागल्याने संकेत दिलीप डोके वय २० वर्षे, विजया दिलीप डोके वय ४० वर्षे, ओंकार चंद्रकांत सुक्रे वय २० वर्षे तिघे रा. खडकवाडी ता. आंबेगाव जि. पुणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला, या अपघाताबाबत संपत चंदर डोके वय ४५ रा. खडकवाडी ता. आंबेगाव जि. पुणे यांनी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. तर शिक्रापूर पोलिसांनी टँपो चालक अक्षय बबन साकोरे रा. चांडोली राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस  करत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *