मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : संघर्ष पत्रकार संघ ठाणें जिल्हा वतीने मुरबाड तालुक्यातील गुणवंत व्यक्तीचा गुणगौरव सोहळा एमआयडीसी सभागृह मुरबाड येथे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन पार पडला. यावेळी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळींना पारायण ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करण्यात आले. तर विवीध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तीना सन्मानित करताना समाजशील न्यूज व दैनिक नवाकाळ चे मुरबाड प्रतिनीधी जयदीप अढाईगे यांना निर्भिड लिखाण शैली, राजकीय विश्लेषक, सैनिक पिता म्हणुन गौरविण्यात आले यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी झालेला गौरव हा पुढील काळात जबाबदारी जबाबदारी वाढविणारी असेल असे मत जयदीप अढाईगे यांनी व्यक्त केले. याच वेळी आत्माराम शिंदे ( उद्योगपती), जयदीप खडकबाण ( उद्योगपती ), पंढरीनाथ आलम (उद्योगपती), भाग्यश्री तोंडलीकर (मिस युनिव्हर्स), मनोज देसले (समाजसेवक) सदाभाऊ सोमने (माजी. आदर्श सरपंच), कैलास कोर ( आधार फौंडेशन), रामभाऊ दुधाळे (आदर्श नगरसेवक), स्वरा चौधरी (आदर्श सभापती), ऍड. रुपेश कुर्ले (कायदेतज्ञ्), तुळशीराम भोईर (आदर्श शिक्षक), लियाकत शेख (अभ्यासू व्यक्तिमत्व), नम्रता जाधव (आदर्श नगरसेविक), शैलेश बिडवी ( समाजसेवक, सुभाष घरत (राजकीय अभ्यासक), गोविंद खाटेघरे (आदर्श शिक्षक) या सर्वांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे, शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावले, शिवसेनेचे नेते रामभाऊ दळवी, योगिताताई शिर्के, सीटू संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलीप कराळे, संघर्ष पत्रकार संघाचे मुरबाड तालुकाध्यक्ष नरेश म्हाडसे उपस्थित होते. याचं अनुषंगाने अपंग बांधवांना हि साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले.
ठाणेमहाराष्ट्रमुरबाड
निर्भिड पत्रकार म्हणुन ‘जयदीप अढाईगे’ यांचा सत्कार
By SamajsheelMay 03, 2023, 16:58 pm0
410
Previous Postशेकडो वयोवृद्धांचा एकमुखी निर्धार लढणार आणि सन्मान वेतन मिळवणार ; दरमहा दहा हजार रूपये सन्मान वेतनाची मागणी
Next Postनारायणराव फडतरे 'डाँ मणीभाई राष्ट्र सेवा' पुरस्काराने सन्मानित