BREAKING NEWS
Search

नीरा नरसिहपूर,पुणे : इंदापूर तालुक्यातून हज (उमराह) यात्रेेला जाणा-या २२ मुस्लिम बाधंवाचा बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान

406
            नीरा नरसिहपूर,पुणे : इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने हज (उमराह) यात्रेेला जाणा-या २२ मुस्लिम बाधंवाचा सन्मान करण्यात आला.  सरपंच किरण पाटील व जेष्ठ नेते अशोक घोगरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.उमराह यात्रेेला जाणारे अस्लम मुलाणी, चाँदभाई सय्यद, इन्नुस मुलाणी, बाबुलाल डांगे, मुबारक शेख, नजीर सय्यद, अजमुद्दीन मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य मुनीर आतार, दस्तगिर शेख, मुबारक मुलाणी आदि २२ मान्यवर उपस्थित होते. तसेच उमराह यात्रेेवरून परतलेले मौलाना रशिदभाई आत्तार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
            या वेळी उपस्थित मुस्लींम बाधवांचा सत्कार सरपंच किरण पाटिल, राष्ट्रवादीचे नेते अशोक घोगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुकाराम घोगरे, उपसरपंच निलेश घोगरे यांच्या हस्ते हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हजला जाणाऱ्या मुस्लीम बाधंवाना बावडा गावचे प्रथम नागरिक सरपंच किरण पाटील यांनी गावाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अमोल घोगरे, जिग्णेश कांबळे, ग्रामसेवक भागवत नागापुरे, बाळासाहेब जाधव, दिलीप दिक्षीत अन्य ग्रामपंचायत कर्मचारी व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
– प्रतिनिधी,बाळासाहेब राऊत,(सा.समाजशील,नीरा नरसिहपूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *