BREAKING NEWS
Search

पर्यावरण पूरक गणपती विसर्जन ; शिक्रापूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

20

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सालाबाद प्रमाणे यंदाही शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गणेश उत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या वेळेसही पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आव्हान शिक्रापूर वासियांना करण्यात आले व त्याचा उदंड प्रतिसादही लोकांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या या उपक्रमाला दिला. विशेष म्हणजे यंदा मुबलक प्रमाणात पाऊस पाणी झाल्याचे समाधान ठेवत खूप जणांनी थाटामाटा प्रत्येक घरी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्याचीच प्रचिती ही गणेशाच्या मूर्ती संकलन करताना आली. त्यावेळेस पाच हजाराहून अधिक गणेश मूर्तीचे संकलन झाले. तब्बल तीन टन निर्माल्य गोळा करण्यात आले.  त्यावेळेस तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार यांनी या उपक्रमाची दखल घेत असे उपक्रम तालुक्यातील अनेक गावांनी आदर्श घ्यावा असे म्हणत शिक्रापूर ग्रामपंचायत कौतुक केले. विशेष आमदार अशोक बापू पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता भाभी पवार त्यांनी शिक्रापूर मधील गणेश मंडळांना भेट देत असताना त्यांच्या स्वतःच्या घरातील निर्माल्य आपल्या निर्माल्य कुंडीत टाकून ग्रामपंचायत उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पर्यावरण पूरक गणपती विसर्जन हा ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम शिक्रापूर गावाला जणू एक पायंडा पडला असून, सामान्य जनतेने कोणताही रुसवा फुगवा न धरता न सांगता स्वयं स्फूर्तीने गणेशाच्या मूर्ती दान केल्या. त्यावेळेस सर्वच मोठ्या मंडळाने सुद्धा या उपक्रमात सहभाग घेत हजारोंच्या मूर्ती सुद्धा दान केल्या त्यावेळी ग्रामपंचायतीने सुद्धा सर्व मोठ्या गणेश मंडळाचे व सर्व सामान्य जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमावेळी संपूर्ण दिवसभर चोख नियोजन ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी व शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पी.आय. दीप रतन गायकवाड साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. यावेळी शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे व सरपंच सारिका सासवडे ग्रामपंचायत सदस्य पुजा ताई भुजबळ मा.उपसरपंच सुभाष खैरे, सदस्य प्रकाश वाबळे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, अंकुश घारे, दीपक भुजबळ, सतीश सासवडे आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *