BREAKING NEWS
Search

पुणे : सक्षम सरकार येण्यासाठी ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान

490
पुणे : एकमेकांत गुंतलेले, आघाडी-युतीच्या वादात सापडलेले सरकार आणण्यापेक्षा कोणत्याही एकाच चांगल्या पक्षाची निवड करावी, यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावला तर एक सक्षम सरकार या देशात येऊ शकते. त्यासाठी शहरातील जबाबदार नागरिकांनी एकत्र येत ’व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान सुरु केले आहे. नागरिकांशी संवाद साधून मतदान जागृती करण्याचा प्रयत्न या ’व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी नागरिकांनी पत्रकार परिषदेत घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे, विलास रबडे, मिलिंद भागवत, अभय भंडारी, नचिकेत भंडारी, रविंद्र खाडिलकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
यशवंत घारपुरे म्हणाले, शिपायाची नोकरी करण्यासाठीही दहावी-बारावी शिक्षण असावे लागते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणार्‍या राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही. लोकशाहीच्या नावाखाली निरक्षर लोकांना निवडून द्यावे का हा विचार केला पाहिजे. राजकारण किंवा सगळेच राजकारणी वाईट नाहीत. त्यात अनेक चांगले आणि धडपडीने काम करणारे आहेत. तेव्हा आहे चांगल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारण्याला निवडून देण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारी राजकारण्यांना दूर ठेवायचे असेल, तर आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे सोडल्यामुळे आणि निवडणुकीची सुट्टी फिरायला जाण्यात घालवणे यामुळे आजची राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फायदा घेऊन मूठभर राजकारण्यांनी राजकारण बदनाम केले शिवाय देशाच्या प्रगतीत खोडा घातला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्याला समस्या सोडवाव्यात, आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे वाटत असले, तर आपण प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. तेव्हा जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. मनाशी पक्के करा की यंदा मतदानाचा हक्क बजावणारच. उमेदवार निवडताना त्याचे शिक्षण, त्याची सामाजिक जाणीव, निष्ठा, प्रामाणिकपणा, हे सगळे तपासून बघा. तुमचे मत अमूल्य आहे. ते देताना नीट विचार करून द्या. चांगला आणि सुयोग्य उमेदवार निवड. त्यातून देशाचे भवितव्य उज्ज्वल असेल.
विलास रबडे म्हणाले, योग्य व्यक्तीला मतदान करा व चांगल्या सरकारची अपेक्षा करा. आम्ही जनतेने 100% मतदान करावे म्हणून 1,00,000 बिल्ले तयार केले आहेत. या बिल्यावर ‘Vote for strong government and protect Nation. योग्य उमेदवाराला चांगले सरकार बनविण्यासाठी मतदान करा व देश अपात्र व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारापासून वाचवा. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नाही फक्त चांगले सरकार निवडून येण्यासाठी मतदान करावे व या मोहीमेत सहभागी व्हावे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9822502078, 9820026265 यावर संपर्क साधावा. भेटेल त्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात असून, खेड्यामध्ये जावूनही याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या एकूण २० ग्रुप वेगवेगळ्या भागात काम करत आहेत.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *