BREAKING NEWS
Search

बावडा येथे पल्स पोलिओ लसीकरणास सुरुवात

361

इंदापूर (सा.समाजशील) : बावडा येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात रविवारी सकाळी पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बालकांना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ केला. बावडा येथील प्राथमिक अरोग्य केंद्रअंतर्गत 5785 बालकांना 100 टक्के लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे यांनी दिली. या लसीकरण शुभारंभ प्रसंगी रणधीर पाटील, अमोल घोगरे, रणजीत घाडगे, अंकुश शेंडगे, दादा कांबळे, सचिन सावंत, शंकरराव घाडगे,रणजीत चव्हाण,अक्षय गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *