BREAKING NEWS
Search

महात्मा फुले मिञ मंडळाचा गणरायाला भावपुर्ण निरोप

17

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : अंनत चतुर्थीदिवशी शिक्रापूर व परिसरात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला .गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला… अशा घोषणा गणेश भक्तांनी दिल्या. या मिरवणुकीत ढोल-ताशा, बँजो व पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला. मलठण फाटा येथील महात्मा फुले मिञ मंडळ, कानिफनाथ युवा मंच यांच्या वतीने श्रीं ची शानदार मिरवणूक काढण्यात आली.महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवून भक्तीमय व सामाजिक आशयाचे फलक लावत टाळगाव चिखली येथील भैरवनाथ तालिम वाद्य पथक ठेवण्यात आले. मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होते. अनेक वेशभुषेत माहिला मिरवणूकीत मध्ये सहभागी झाल्या .आकर्षक फाटाकेबाजी महाकाल बाल्स्ट मिरवणूकीचे खास आकर्षण ठरले. मिरवणूक आतिशय शांततेत संपन्न झाली. महात्मा फुले मिञ मंडळ / कानिफनाथ युवा मंच सर्व सभासद यांनी दहा दिवस अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *