BREAKING NEWS
Search

मांजरी खुर्दच्या सरपंचपदी युवा स्वप्नील उंद्रे पाटील यांची बिनविरोध निवड

310
कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, गजानन गव्हाणे) : पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य स्वप्नील दत्तात्रय उंद्रे (पाटील) यांची मांजरी खुर्द, ता. हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच महादेव रघुनाथ उंद्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील उंद्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांनी बिनविरोध घोषित केले. यासाठी ग्रामसेवक सविता भुजबळ यांनी सहकार्य केले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा शहर सरचिटणीस गणेश घोष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, करण मिसाळ, प्रतीक देसरडा, दीपक पवार, भाजपा युवा युवा मोर्चा वडगाव शेरी मतदार संघ सरचिटणीस माऊली उंद्रे, पिंटू हरपळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, रवींद्र कंद, सुहास खुटवड, अमोल शिवले, रवी वाळके, रमेश मदने, विक्रम गायकवाड,सागर हरपळे, माधुरी काळभोर, फुरसुंगीच्या माजी सरपंच उज्वला हरपळे, शिवा उंद्रे, माऊली साळुंखे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष रमेश उंद्रे, विलास उंद्रे, दत्तात्रय म्हस्के, बाळासाहेब भोसले, विकास उंद्रे, किशोर उंद्रे, प्रकाश सावंत, दिलीप उंद्रे, वसंत उंद्रे, गौतम भोसले, उपसरपंच वर्षा उंद्रे, सिताराम उंद्रे , निखिल उंद्रे, प्रतीक भोसले, प्रतिमा उंद्रे, कीर्ती माऊली उंद्रे, रेखा पवार, सीमा सावंत, वैशाली काकडे, मनीषा डेरे, जयश्री हंकारे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली १०-१२ वर्षे स्वप्नील उंद्रे पाटील अविरतपणे समाजकार्यात व्यस्त आहेत. २०१० ते 20१५ ग्रा.पं सदस्य, १० वर्षे सोसायटी संचालक आणि चेअरमन युवामोर्चा हवेली तालुकाध्यक्ष त्याच सोबत ते आता भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष आहेत. स्वप्नील यांचे पंजोबा सदाशिवराव गेनुजी उंद्रे (पाटील) हे ग्रामपंचायत स्थापनेनंतर गावचे पहिले सरपंच होते. 1963 नंतर या कुटुंबात प्रथमच सरपंच पदाची संधी मिळाल्याने स्वप्नील उंद्रे पाटील हे गावातील सर्वात युवा कुमार सरपंच बनले आहेत.

आगामी काळात मांजरी खुर्द चा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल करून गाव नवीन विकासाच्या वाटेवर आणणार असल्याचे स्वप्नील उंद्रे यांनी सांगितले. सरपंचपद केवळ नावासाठी नाही तर लोकसेवेसाठी असते. गावाची वेस, कचरा व्यवस्थापन आणि केंद्र/राज्य सरकारने ग्रामीण भागासाठी आणलेल्या योजना ते सर्वांपर्यंत पोहचविणे. गावाचा विकास आराखडा. गावाचा शैक्षणिक दर्जा वाढवणे, गावातील धर्मस्थळं स्वच्छ ठेवणे व त्यांची निगा राखणे, महीला, युवक, युवती रोजगार आणि कल्याणकारी योजना राबवणे, वेळोवेळी ग्रामसभा घेऊन लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वप्नील उंद्रे यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *