BREAKING NEWS
Search

माळशेज घाटात लक्झरी बसला अपघात – दहा प्रवासी जखमी  

895
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – माळशेज घाटातील सावर्णे येथील वळणावर काल रात्री लक्झरी बस पलटल्याने दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
        उल्हासनगर येथून औरंगाबाद येथे हमसफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस एम एच .20.डि डि 267 ही ४०  प्रवासी माळशेज घाट मार्गे औरंगाबाद येथे घेऊन जात असताना चालकाचे लक्झरी बस वरील नियंत्रण सुटल्याने लक्झरी महामार्गाच्या बाजूला पलटली. या अपघातात दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी काहींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर,  ३ प्रवासी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल आहेत.व दोघांना कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे प्रवासी उल्हासनगर, कल्याण,औरंगाबाद येथील असल्याचे समजते. घटनास्थळी टोकावडे पोलिस ,राष्ट्रीय महामार्ग पोलीस, सावर्णे येथील गावकरी मोठ्या संख्येने मदत कार्य करत होते. अपघात रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाल्याने मदत कार्य मिळण्यास उशिर झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *