BREAKING NEWS
Search

मुरबाड,ठाणे : माजी आमदार बी. के. भगत प्रतिष्ठाणचा तंबाखुमुक्ती साठी मुरबाड मध्ये जनजागर, प्रतिष्ठाचे अध्यक्ष अनिलभाऊ भगत आणि अँड.अर्चना भगत,सलाम मुंबई यांचा सामाजिक व स्तुत्य उपक्रम

781
        मुरबाड,ठाणे :  माजी आमदार बी. के. भगत प्रतिष्ठाण आयोजित मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तंबाखुजन्य पदार्थ सेवन न करण्यासाठी जोरदार मोहीम उघडली असून त्याची सुरुवात या प्रतिष्ठाचे अध्यक्ष अनिलभाऊ भगत आणि अँड.अर्चना भगत यांनी केली आहे.
         ग्रामीण भागातील  तरुण वर्ग  तंबाखु आणि  महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मशेरी च्या आहारी गेल्या  आहेत. त्यांना या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या या  सवयी पासून परावृत करण्या साठी माजी आमदार बी. के. भगत प्रतिष्ठाण आणि सलाम मुंबई यांच्या माध्यमातुन व्यसन मुक्तीचे धडे देऊन या पासून परावृत करण्यासाठी या संस्थानी जोरदार कंबर कसली आहे.त्यांच्या या विधायक व सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे मुरबाड परिसरातून कौतुक होत आहे.
          याचाच एक भाग म्हणून मुरबाड तालुक्यातील मोहरई, शिरगाव या गावात राष्ट्रीय तंबाखु  नियंत्रण कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई आणि आमदार बी. के. भगत प्रतिष्ठान ,सलाम मुंबई च्या माध्यमातून तंबाखुमुक्त आरोग्यदायी जीवनाची शपथ येथील गावकऱ्यांना देण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार बी. के. भगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भगत, अँड. अर्चना भगत,ओमकार भगत, स्वरूप भगत,मुस्लिम अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रियाजभाई शेख, जेष्ठ नेते मेहबूबभाई पैठण कर, पोलीसपाटील पांडुरंग पाटील, तुकाराम चौधरी, शांताराम चौधरी, विकास चौधरी, बंटी चौधरी, विशाल कांबळे यांनी कँसर सारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देणाऱ्या तंबाखुजन्य पदार्थांना वेळीच आळा घालून “निरोगी ह्रदयाचा स्वीकार, देऊया तंबाखुला नकार” ,एकच निर्धार तंबाखु मुक्त गाव असा नारा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
 – प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *