BREAKING NEWS
Search

मुरबाड,ठाणे : मुरबाड ग्रामिण रुग्णालयाची आरोग्य उपसंचालकाडुन पहाणी, रखडलेले ट्राम सेटंर व अस्वच्छता या बाबत केली नाराजी व्यक्त

494
        मुरबाड,ठाणे : मुरबाड ग्रामिण रुग्णालयात अचानक आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, मुंबई मंडळ ठाणे व सिव्हिल सर्जन ठाणे कैलास पवार यानी भेट देवुन येथिल कारभाराची पहाणी करत  ट्रामाकेअर सेटंरचे  रखडलेले बांधकाम व ग्रामिण रुग्णालयातील व परिसरातील अस्वच्छता पाहुन नाराजी व्यक्त केली.
             मुरबाड ग्रामिण रुग्णालय हे तीस बेडचे असुन या रुग्णालयाला कागदावर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्याचे जाहीर करण्यात आले होते.  मात्र हि घोषणा  कागदावर असतानाच मुरबाड मध्ये ट्रामाकेअर सेटंरला बांधण्याचे काम सुरु करण्यात आले.  मात्र ठेकेदाराची वैयक्तीक अडचण व सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार यामुळे हया रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत ग्रामिण रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या दुर्लक्षा मुळे झालेले घाणाचे साम्राज्य याबाबत नाराजी व्यक्त केली. मुरबाड ग्रामिण रुग्णालयात मुख्य अधिक्षक पद अनेक वर्षा पासुन रिक्त असल्याने या रुग्णालयाचा कारभार अनियंत्रित  झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.  नुकतीच या रुग्णालयात सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर चे उद्घाटन करण्यात आले होते मात्र थोड्याच दिवसात हे पडल्याने  हे  ऑपरेशन थिएटर त्वरित सुरु करतो असे आश्वासन यावेळी देण्यात आले. कागदावर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असला तरी पन्नास बेड ची  पुर्तता झाल्या शिवाय जादा कर्मचारी  देवु शकत नाही या बाबत खंत ही व्यक्त केली. यावेळी अनेक विषयावर डॉ.गोरी राठोड यानी चर्चा करत डॉक्टराच्या उपस्थिति व अनुपस्थीती वर आपले लक्ष असुन रुग्णाकडुन पैशाची मागणी केल्यास मला सांगा ईलाज केला जाईल असे हि  सांगितले.  अचानक दिलेल्या भेटी मुळे ग्रामिण रुग्णालयातील कर्मचारी,डॉक्टर यांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसुन आले.
– प्रतिनिधी,जयदीप अढ़ाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *