BREAKING NEWS
Search

मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील किशोर गावात डेंग्युच्या साथीच्या अफवेने घबराट,गावात एक डेंग्युचा रुग्ण असल्याची माहीती

742
           मुरबाड,ठाणे :मुरबाड तालुक्यातील किशोर गावामध्ये ताप व रक्तातील प्लेट लेट कमी असणारे रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र किशोर गावातील १० लोकांच्या रक्ताचे नमुने ठाणे येथे तपासणी साठी पाठवले असता फक्त एका रक्ताच्या नमुन्यात डेंग्यूचे जंतू आढळले असल्याने डेंग्यूची साथ नसल्याचे किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ माधव कावळे यांनी सांगितले तर  राजाराम गणपत गायकर (45) याला  डेंग्यु असल्याची माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी बनसोडे यानी दिली.मुरबाड शहरातील मुरबाड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल मध्ये स्वामी गायकर, , वैशाली गायकर रहाणार  किशोर तर नाना पाटील हे पनवेल हुन आलेल्या रुग्णावर डेंग्युचा उपचार सुरु असल्याची माहती डॉ. निलेश खोडदे यानी दिली.  तर मुरबाड मधिलच एका खाजगी हॉस्पीटल मध्ये बंधु सुरोशे (सुरोशेपाडा), दिपक सुरोशे, (खेवारे) अंनत गायकर यांच्यावर डेंग्युचा उपचार सुरु आहे.  तर मधुकर गायकर, व राजाराम कृष्णा गायकर हे  डेंग्युच्या उपचारानंतर घरी गेल्याचे डॉ पस्टे यानी माहीती दिली.  तर मुरबाड ग्रामिण रुग्णालयात ४०  रुग्ण टायफाईड चा उपचार घेत असल्याची माहीती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.नरहरी फड यानी दिली.
             आरोग्य विभागाने किशोर गावामध्ये तपासणी सुरु केली आहे तसेच गुरुवारी रात्री गावामधील डास पकडून तपासणी साठी पाठवले आहेत. ग्रामपंचायतीने परिसर स्वच्छता तसेच धूर फवारणी केली असून उद्या शुक्रवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे अशी माहीती आरोग्य विभागाने दिली.  या साथीच्या आजारा बाबत प्रतिक्रिया देताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे
डॉ माधव कावळे यानी  सांगितले कि, रक्तातील प्लेट लेट फक्त डेंग्यू मुळेच कमी होतात हा लोकांचा गैर समज आहे.  इतरही कारणाने त्या कमी होऊ शकतात. खाजगी लॅब प्रमाणे किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त नमुने तपासण्याची व प्लेट लेट वाढण्यासाठी औषधोपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ माधव कावळे यांनी सांगितले. लोकांनी घाबरुन न जाता स्वच्छतेकडे लक्ष देवुन आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
– प्रतिनिधि:-जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *