BREAKING NEWS
Search

मुरबाड,ठाणे : मुरबाड शहरातील खरब्याच्या वाडीत किरकोळ वादातुन हाणामारी, एक जण गंभीर जखमी

635
             मुरबाड,ठाणे : मुरबाड शहरातील खरब्याच्या वाडी येथे शुक्रवार दि २० संप्टे.  रोजी रात्री ११ वाजता किरकोळ  कारणात्सव दोन कुटुबात हाणामारी झाली.  यात एक जण गंभीर जखमी असल्याचे पोलिस सुत्राकडुन सांगण्यात आले.
             याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रेश्मा रामा थोरात रा. तळेगाव हल्ली मुक्काम खरबावाडी यांचे घरातुन सागर मधुकर खोळंबे यांच्या घरात विज पुरवठा देण्यात आला होता. मात्र वाढिव विज बिला मुळे रेश्मा थोरात यानी विज पुरवठा खंडीत केला. याचा राग मनात धरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली व त्याची नंतर हाणामारीत रुपातंर झाले.  यावेळी रेश्मा थोरात यांचा दिर मनोज थोरात यास गंभिर दुखापत झाली तर सागर मधुकर खोंळबे व योगेश मधुकर खोळंबे यातील योगेश याला ही दुखापत झाली.  या दोघाना अटक करण्यात आली आहे.  तर मनोज थोरात यास गणपती हॉस्पीटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या वेळी घटनास्थळी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यानाही धक्काबुक्की झाल्याची माहीती देण्यात आली, अटक आरोपीना ५ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असुन परस्पराविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

– प्रतिनिधी, जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *