BREAKING NEWS
Search

मुरबाडमधील ओरीएंटल कंटेनर कंपनीतील 50 वर्षांवरील कामगारांना दिलासा ; पूर्ववत कामावर रुजू

291

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड एम आय डी सी मधील नामांकित अशी ओरिएंटल कंपनी अनेक महिन्यापासून बंद होती. यामुळें कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती, अनेक कामगार उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात स्थलांतरीत झाले. मात्र अक्षयतृतीया च्या मुहूर्तावर तब्बल 14महिन्या नंतर कंपनी सूरू झाली मात्र यावेळी 50 वर्षा वरील कामगारांना न घेण्याचा कंपनी प्रशासनाने निर्णय घेतला

होता. या निर्णयाला काही कामगारांनी विरोध केला होता. मात्र या वयात आपल्याला कोण नोकरी देणार? आपला उदरनिर्वाह कसा भागणार हा प्रश्र्न भेडसावत असताना या कामगारांना कंपनी प्रशासनाने दिलासा दिल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कंपनी पूर्ववत सुरू झाली असताना 50 वर्ष वयोगटातील कामगारांना सक्तीने घरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळें पुढील उदरनिर्वाह कसा होणारं? हा प्रश्र्न अनेकांना भेडसावत असताना कंपनी व्यवस्थपनाने नवे धोरण अवलंबित अटी व शर्ती ठेऊन कंपनी सूरू केली कामगारांच्या एकजुटीमुळे कंपनी पूर्ववत सुरू झाली कंपनी प्रशासनाने 50 वर्षा वरील वयाच्या कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता, या हि निर्णयाला कामगार तयार झाले होते यामुळें जवळपास 160 ते 170 कामगाराना घरी बसावे लागणार होते . केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्याचा कंपनी मालक पुरेपूर फायदा घेत असून कामगारांना मात्र पोटाची भूक भागवण्यासाठी या कायद्याला बळी पडावे लागत असल्याचे कामगार बोलत आहेत. यामुळें कामगार कायद्यातील बदल हे कामगारांसाठी आहे की कारखानदारांनसाठी आहे ?असा सवाल उपस्थित केला जात असताना कंपनी प्रशासनाने 50 वर्षा वरील कामगारांना पूर्ववत कामावर घेतल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *