BREAKING NEWS
Search

मुरबाड कोव्हीड सेंटर त्वरित सुरु करण्यासाठी मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस चे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र

593

स्थानिक राजकारण अडथळा ठरत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप  

मुरबाड,ठाणे (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता व मोठ्या शहरात मुरबाड मधील कोरोना बधितांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने मुरबाड शहरात ग्रामीण रुग्णालयाशेजारी नवीन ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत कोव्हीड सेंटर तयार करण्यात आले आहे. मात्र या कोव्हीड सेंटरमध्ये वैद्यकीय व इतर कर्मचारी नियुक्ती न झाल्याने ते अजून ही कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. ही प्रतीक्षा त्वरित संपवून हे कोव्हीड सेंटर त्वरित सुरू करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून देणारी मागणी मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक वाघचौरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे लेखी निवेदनाद्व्यारे केली आहे. आरोग्य मंत्री टोपे हे बदलापूर येथे आले असता ही मागणी करण्यात आली.  मुरबाड शहरात खाजगी कोव्हीड सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून सरकारी कोव्हीड सेंटर चे काम पूर्ण होऊन ही कर्मचाऱ्यांअभावी ते सुरू झाले नाही. तर खाजगी कोव्हीड सेंटर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्यामुळे, सरकारी कोव्हीड सेंटर सुरू झाल्यास बधितांना याचा फायदा होणार आहे. तर मुरबाड नगरपंचायत मध्ये भाजपची सत्ता असल्याने राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे सरकार बदनाम करण्यासाठी कदाचित राजकीय हेतूने हे कोव्हीड सेंटर सुरू होते नसल्याचा आरोप मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक वाघचौरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. तर जिल्हाधिकारी व प्रांत अधिकार यांच्या कडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशाबाबत नगरपंचायत कडून नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे हे त्यांनी सांगितले. नागरिकांना कुठल्याही सूचना न  देता कधीही बाजरपेठ बंद करत असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी  जादा भावाने खरेदी करावी लागत आहे या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या वर करवाई करण्याची मागणी ही यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *