BREAKING NEWS
Search

मुरबाड च्या ग्रामीण भागातील कुठल्याही कलेचा वारसा नसताना बनला कलाकार

618
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील एकलहरे गावचा गणेश देसले याने आपल्या आवाजाच्या जादूने कुठल्याही कलेचा वारसा नसताना पडद्याआड  गेलेल्या कलाकार व मान्यवरांच्या आवाजाची उभेउभ मिमिक्री करत जनतेच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली असून, गेल्या 10 वर्षा पासून आपल्या आवाजाच्या जादूने कलाप्रेमी च्या हृदयावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. विनोदी कलाकार दादा कोंडके, निळु फुले, यांचे भारदस्त आवाज, सिनेसृष्टीतील नाना पाटेकर, अक्षय कुमार, सयाजी शिंदे,  कॉमेडी किंग जॉनी लिव्हर,  सुप्रसिद्ध गायिका गान कोकीळा लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, मकरंद अनासपुरे, ऋतिक रोशन, अंकुश चौधरी, चला हवा येऊद्या  मधील भाऊ कदम, राज कुमार, सनी देओल, निलेश साबळे, भारत गणेशपुरे,  रितेश देशमुख, प्रकाश राज, विजय राज अशा प्रकारे आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांची सुद्धा आवाजे काढतात, राजकीय नेते बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, रामदास आठवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गाजलेल्या सैराट या चित्रपटातील परश्या म्हणजेच आकाश ठोसर याच्याआवाजाची मिमिक्री अफलातून सादर करतो.  एका खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा कुठे हि कलेचे धडे न घेतलेला फक्त आणि फक्त नैसर्गिक कृपेने महाराष्ट्रभर आपल्या कलेचा ठसा उंमटविण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कलेच्या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाण शहरात वास्तव्याला असलेल्या मुलामुलींचे होते पंरतु मागिल १० वर्षापासून मात्र ग्रामीण भागातील कलाकर सुध्दा वेगवेगळ्या प्रकारच्या कला क्षेत्रात पुढे येत आहेत त्यातील गणेश एक हा प्रयत्नशील कलाकार तालुक्यातून पुढे येत असल्याचे दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *