BREAKING NEWS
Search

मुरबाड तहसील कार्यालयावर राजस्थान मधील घटनेचा निषेध व विविध मागण्यांसाठी आर.पी.आय. सेक्युलर निषेध मोर्चा

394
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राजस्थान मधील सुराणा सरस्वती विद्यालयात इंद्र देवराम मेघवाल (8) या विद्यार्थ्याची जातीय वादातून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज मुरबाडमध्ये आर पी आय सेक्युलर ने मुरबाड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढून या दुर्दैवी घटनेचा निषेध व संताप व्यक्त केला. याच वेळी तालुक्यांतील विवीध मागण्या ही या मोर्चातून करण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळी साडे अकरा ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करावी, तालुक्यांतील ग्रामसेवकांचे ग्रामपंचायत मधील कामाचे वार व मोबाइल नंबर पंचायत समितीच्या आवारात लावले जावे जेणे करून नागरिकांचा त्रास कमी होईल, तसेच तलाठी, मंडळ अधिकारी यांचे ही नंबर तहसील कार्यालयात प्रसिद्ध करून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या सजेवर कार्यरत रहावे, मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील बेजबाबदार व मनमानी कारभाराची चौकशी करावी, मुरबाड पंचायत समिती प्रवेशद्वार ते मुरबाड ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर पथदिवे लावावे, मुरबाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले बचत गट भवन खुले करावे, यातील गाळे शासनाने ताब्यात घ्यावे, तर तालुक्यांतील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मुरबाड तालुक्यात पुनर्वसन करण्यासाठी विस्थापित केलेले साखरमाची या आदिवासीं 20 कुटुंबांचा प्रश्र्न कायम स्वरुपी मार्गी लावून त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करणे कामी पैसै हडप करणाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गून्हा दाखल करावा अश्या विवीध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व आर पी आय सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदणे यांनी केले. यावेळी दिलिप धनगर, जगदीश साटपे, निखिल अहिरे, किशोर गायकवाड, लक्ष्मण खोलंबे, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर तहसीलदार संदीप आवार यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाईचे आश्वासन दिलं. तर पो नि प्रसाद पांढरे यांनी आज शहरात अनेक कार्यक्रम असताना चोख बंदोबस्त ठेवला होता.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *