BREAKING NEWS
Search

मुरबाड तालुका रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन महिला आघाडी अध्यक्षपदी प्रियंका घायवट यांची निवड

325

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड येथे महीला कामगार व कर्मचारी  वर्गाला न्याय मिळण्यासाठी व त्यांच्यावर होणारा अन्याय  कामातील अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार तथा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.रामदासजी आठवले यांच्या आदेशाने मुरबाड रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनच्या महीलाआघाडी अध्यक्षपदी प्रियंक घायवट यांची निवड करण्यात आली. यावेळी दादासाहेब शिंदे (ठाणे जिल्हा अध्यक्ष), भगवान पवार(ठाणे जिल्हा नेते, रि ये फे) अध्यक्ष व महेंद्र धनगर (तालुका अध्यक्ष)यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा (रि ए फे)नेते भगवान पवार यांनी प्रियंका घायवट या संघटनेने केलेला नियुक्तीचे पूर्णपणे चांगल्या प्रकारे उपयोग करतील व आमचे नेहमी त्यांना सहकार्य असेल असे सांगितले. तर यावेळी प्रियंका घायवट यांनीही दिलेल्या पदाचा चांगला वापर करून समाजाशी बांधिलकी ठेवून मी महीला कर्मचारी वर्ग यांना न्याय मिळवून देईल. असे विचार मांडले. यावेळी आर पी आय तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, भाजप अनुसूचित जाती जमाती विभाग अध्यक्ष अण्णा साळवे  संजय कोळंबे, प्रकाश जाधव,संजय बोरगे, दत्ता माळवे, शंकर करडे, दयानंद रातांबे, भगवान जमधरे, सय्यद भाई शेख हे उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *