( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्ण सेवेसाठी 108 ची भरीव कामगिरी तर 102 चा कारभार सुस्त - समाजशील मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्ण सेवेसाठी 108 ची भरीव कामगिरी तर 102 चा कारभार सुस्त - समाजशील
BREAKING NEWS
Search

मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्ण सेवेसाठी 108 ची भरीव कामगिरी तर 102 चा कारभार सुस्त

369

मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्ण सेवेसाठी 108 ची भरीव कामगिरी तर 102 चा कारभार  सुस्त  : ठाणे जिल्ह्यातील 108 च्या 40 रुग्णवाहिका सतत कार्यरत

             मुरबाड.ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मागील वर्षा पासून कोरनामुळे राज्यासह देशात आरोग्य सेवा सतत कार्यरतअसताना कोरोना बधितांना ने आण करण्यासाठी शासनाची 108 या रुग्णवाहिकेची कामगिरी भरीव ठरत असून यावर कार्यरत असणारे डॉक्टर व पायलट यांच्या कामाचे मुरबाडच्या ग्रामीण भागात कौतुक होत आहे.
              मात्र जिल्हा परिषदेच्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सध्या बुजगावणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दारात उभ्या असल्याचे पहायला मिळाले आहे.यामुळे शासनाची 108 क्रमांकाची रुग्ण सेवा हेल्पलाईन कोरोना रुग्णांची लाईफलाईन बनली आहे.
  108 रुग्णवाहिनी 24 तास कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल असल्याने ग्रामीण भागात रुग्णवाहिका मिळाली नाही. म्हणून कोणत्याही रुग्णावर जीव गमावण्याची वेळ आलेली नाही. गेल्या बारा महिन्याच्या कोरोना काळात ठाणे जिल्ह्यात तब्बल 3 हजारहुन अधिक  कोविड रुग्णांची ने- आन 108 रुग्णवाहिकानी केली. अपघात, प्रसूती अशा कित्येक रुग्णांना या सेवेमुळे जीवदान मिळाले आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांना 108 रुग्णवाहिनी चा आधार मिळत आहे
              ठाणे जिल्ह्यात एकूण 40 रुग्णवाहिका कार्यरत असून त्यातील ग्रामीण भागात कोरोना काळात तब्बल 25 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. पैकी 22 रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मुरबाड तालुक्यात मुरबाड, टोकावडे, मोरोशी अशा 3 रुग्णवाहिका आहेत जिल्हा परिषदेच्या 102 सुविधेच्या रुग्णवाहिका प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांसमोर उभ्या आहेत. मात्र या रुग्णवाहिकांना कोविड रुग्णांची भीती वाटत आसल्याने त्या कोविड रुग्णवाहिका म्हणून कुठी दिसून येत नसल्याचे दिसून आले आहे .
108 च्या जिल्हा व्यवस्थापनाने ग्रामीण भागात सर्व कोविड केअर सेंटरमध्ये या रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात गंभीर होणा-या प्रत्येक कोरोना रुग्णाला 108 रुग्णवाहिके मार्फतच ग्रामीण भागातून शहरातील कोरोना हाॅस्पिटलमध्ये येऊन जात येत आहेत.यामुळेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध आहे.जिल्ह्यात 108 हेल्पलाईन साठी 140 डॉक्टर व 85 पायलट सतत  सेवेत रुजू असून  कोरोनाच्या काळात डॉक्टर, चालक यांना पीपीई किट, सॅनिटायझर, शिवाय कोरोना ग्लोव्हज शिवाय रुग्णांची हाताळणी करावी लागत आहे. प्रत्येक कोरोना बाधित किवा संशयीत रुग्ण हाताळल्या नंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करून पुढील रुग्ण हाताळायला तयार केली जाते. अशावेळी चालकांच्या व डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अत्यंत तुटपुंज्या पगारावर चालक कोणत्याही संरक्षक कवचाशिवाय आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत.
             मुरबाड मध्ये एकूण 03 रुग्णवाहिका असून, 3 डॉक्टर व 6 चालक (पायलट) काम करीत आहेत. डॉक्टर नसल्याने टोकावडे येथील रुग्णवाहिका तात्पुरती सेवेत नसल्याने दोनच रुग्णवाहिका कार्यरत आहेत.अति गंभीर झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन वर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळत आहे. रुग्णवाहीकेवर डॉक्टर असल्यामुळे त्वरित रुग्णांवर  उपचार सुरु करून हॉस्पिटलला भरती केले जात आहे.या बाबत डॉ आकाश शिंदे यांनी सांगितले की ” गंभीर रुग्णाला जीवदान नि एखाद्या भगिनींची  प्रसूती सुखरूप होऊन बाळ बाळंतीण सुखरूप घरी पोहचवली की आम्हाला खुप अभिमान वाटतो.तर बी व्ही जी सहाय्यक ठाणे जिल्हा व्यवस्थापक अभिजित माने यांनी “माझी टीम,डाॅक्टर व पायलट (वाहनचालक ) हे आपल्या प्राणाची बाजी लावुन काम करत आहेत. त्यांना काहीच कमी पडणार नाही यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *