BREAKING NEWS
Search

मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावर खड्यांचे साम्राज्य

349

कोरोनाशी एकाकी लढणाऱ्या मुरबाडकरांना खड्यामुळे आणखी संकट नको

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्ग 61 वर मुरबाड ते पिराची उमरोली या भागात मोठया प्रमाणात खड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. मुरबाडकर सध्या कोरोनाशी एकाकी लढत असताना खड्यांमुळे दुसरं संकट नको अशी प्रतिक्रिया काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी या मार्गावरून प्रवास केल्यावर दिली. या बाबत त्यांनी दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे यांना ईमेल तसेच दुरध्वनी व्दारे मुरबाड-अहमदनगर महामार्गावरील (मुरबाड ते उमरोली पि.) रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी आपल्या आख्यारित येत असलेल्या या महामार्गावर   मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी स्वार अथवा मोठ्या वाहनाची देखील गंभीर स्वरुपाचा अपघात होण्यासह जिवितहानी तसेच आर्थिक नुकसान होवु शकते. कोरोनाच्या ह्या महाभयंकर रोगाशी नागरिक एकाकी झुंज देत असताना अजुन आपल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडुन एखाद्या संकटाचे निमंत्रण मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी नको असे यावेळी चेतनसिंह पवार यांनी  सूचित करून सदरच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *