BREAKING NEWS
Search

मुरबाड पोलीसांकडून मोठ्या प्रमाणावर गावटी हातभट्टी दारू भट्ट्या उध्वस्त ; गावठी दारू समूळ नष्ट मोहीम जोरात

554
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड पोलिसांनी नजीकच्या काळात गावठी हातभट्टीच्या दारू विरोधात जोरदार मोहीम उघडली असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई अभियान राबवत मोठी कारवाई करत गावठी दारू समूळ नष्ट मोहीम राबवत सर्व दारू भट्ट्या नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. पावसाळ्यात वाढलेल्या गवताचा आधार घेऊन काही दारू भट्ट्या चालू असल्याबाबत खास गुप्त बातमीदारांनी मुरबाड पोलीसांना दिलेल्या खबरी वरून
गेल्या 4 दिवसात मुरबाड पोलीसांनी वेगवेगळ्या टीम बनवून मोठी कारवाई करून संपूर्ण हातभट्ट्या उद्वस्त करून गुन्हे दाखल करून संपूर्ण साहित्य नष्ट केले आहे. या कारवाईसाठी एक विशेष पथक निर्माण करून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त मोहिम उघडून केलेल्या कारवाईमुळे हे यश प्राप्त झाले आहे. मुरबाड पोलीसांच्या ह्या कारवाईचे सर्व मुरबाड तालुक्यात कौतुक होत आहे. या कारवाईसाठी वरिष्ठ पो.नि.पांढरे, सपोनि सोनोने, PSI तळेकर, PSI निंबाळकर, PSI दाभाडे, PSI सावंत, PSI तडवी,सहाफौज गुंड, विचारे,शेलार, डोईफ़ोडे, अडबोल, चतुरे, भोसले, गांजाळे, पोना रामा शिंदे, जयवंत मोरे, जीवन पाटील, कैलास पाटील, तातळे, पोशि. घोडे, उदमले ,थोरात, चालक शरद शिरसाठ, भगवान बांगर, महीला पो शिपाई जया फ़ाळे, पारधी, योगिता भोईर, सपना भोईर यांचा सहभाग होता.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *