BREAKING NEWS
Search

मुरबाड मध्ये जिल्हा काँग्रस चे नवसंकल्प कार्यशाळा संपन्न ; आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर तयारी सुरु

342
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : उदयपूर येथील राष्ट्रीय व शिर्डी येथील राज्यस्तरीय नवसंकल्प कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर म.औ.वि.म. सभागृह, मुरबाड येथे ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एकदिवसीय नवसंकल्प कार्यशाळा जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आली होती. प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, माजी खासदार सुरेश टावरे, जेष्ठ नेत्या सुमनताई घोलप, तुकाराम ठाकरे, पोपटराव देशमुख, अशोक फनाडे, कृष्णकांत तुपे, प्रमोद मडके, असगर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा झाली. सदरच्या शिबिरामध्ये राज्यसभा खा.कुमार केतकर, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, म्हाडाचे माजी अध्यक्ष रमेश किर, सोशल मिडीयाचे प्रदेश समन्वयक विनय खामकर, जेष्ठ नेते सोहेल खान यांनी व्याख्याने केली.
उदयपूर येथील राष्ट्रीय व शिर्डी येथील राज्यस्तरीय नवसंकल्प कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर मुरबाड येथे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित नवसंकल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी मत व्यक्त केले. गरुडाच्या पुनर्जन्म प्रमाणे नवसंकल्प कार्यशाळा ही ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्तांसाठी नवसंजीवनी असल्याचे मत कार्यक्रमाची संयोजक तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीयांना एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष कायमच आघाडीवर राहिला आहे. परंतु, गेल्या 8 वर्षांपासून ध्रुवीकरणाचे राजकारण करत समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या या ‘भारत तोडो’ ला काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ ने उत्तर देणे गरजचे आहे. असे विवेचन खा.कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी ‘पुन्हा एकदा काँग्रेस’ चा जो नारा दिला आहे तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी आपण सर्वानी मिळवून एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे आवाहन सचिन सावंत यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शहापुर तालुकाध्यक्ष महेश धानके, अंबरनाथ तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, बदलापुर शहराध्यक्ष संजय जाधव, कल्याण तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, भिवंडी तालुकाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हासरचिटणीस रविंद्र परटोले, जिल्हाउपाध्यक्ष संजय शेलार, जिल्हा सरचिटणीस पुंडलिक चहाड, युवकचे धनाजी बांगर, अनिल चिराटे, संध्या कदम, शुभांगी भराडे आदींनी मेहनत घेतली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *